ऑगस्ट 2026 च्या ठळक बातम्या
2 ऑगस्ट 2026
भातलावणी उपक्रम
“मातीचा घाम आणि शेतकऱ्याची मेहनत… हेच आहे भाताच्या शेतीचं सौंदर्य ..
पावसाच्या सरी, मैत्रीचा सुगंध आणि शेती संस्कृतीचा उत्साह घेऊन आपण ऑगस्ट महिन्याची सुरुवात केली 2ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे आणि शेत लावणी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला .
आपल्या सर्वांचे लाडके लक्ष्मण पाटील सर आणि पुष्पा ताई यांच्या फार्महाऊसवर, त्यांच्या सुंदर आणि हिरव्यागार शेतात.“पावसाच्या सरी, चिखलाचा आनंद आणि लावणीची धमाल , मैत्रीचा उत्साहात आपण एक अविस्मरणीय दिवस एकत्र साजरा केला ”
या कार्यक्रमात Rotrian, Anns, Annets जास्त संख्येने उपस्थित राहिले होते.
हा एक अविस्मरणीय अनुभव होता आणि चिखलात लावणीचा आनंद घेताना आपल्या रोटरी परिवारातील सदस्यांना पाहून खूप आनंद झाला. अशा अनुभवांमुळेच स्वतःची आणि समाजाची अधिक चांगली सेवा करण्याची ‘ऊर्जा’ आपल्याला मिळते. सर्वांचे अभिनंदन आणि कौतुक!
7th ऑगस्ट – classification Talk
क्लबच्या सभेमध्ये रोटेरियन अमित चंदाने यांनी माहिती तंत्रज्ञान (Information Technology) या विषयावर अत्यंत उपयुक्त आणि ज्ञानवर्धक मार्गदर्शन केले. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवन, शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये होत असलेला प्रभाव स्पष्ट केला.
तसेच, डिजिटल युगात सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड तंत्रज्ञान आणि डेटा व्यवस्थापन यांचे महत्त्व अधोरेखित करत तंत्रज्ञानाचा योग्य व सुरक्षित वापर करण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे उपस्थित सदस्यांना माहिती तंत्रज्ञानातील नवीन संधी आणि बदलांविषयी मौल्यवान माहिती मिळाली.प्रशनोत्तरांच्या माध्यमातून खूप छान माहिती मिळाली.
सेक्रेटरीअल रीपोर्ट मधे पुढील आठवड्यातले वाढदिवस आणि ॲनिव्हरसरीज सांगण्यात आल्या. तसेच या आठवड्यात होणारे प्रोजेक्टस् सांगितले.मिटींग संपल्यानंतर अर्थातच एकदम हटके जेवणाचा आस्वाद सगळ्यांनी घेतला..
9th ऑगस्ट –फळ झाडे वृक्षारोपण
हिरवाईची नवी सुरुवात!
कोंबल टेकडी येथे वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला. येथे फळझाडे वृक्षारोपणाचा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. या उपक्रमासाठी अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलेले सर्व रोटरी सदस्य, रोटरी ॲन्स, रोटरी ॲनेट्स आणि रोट्रॅक्टर्स यांच्या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उपक्रम अधिक सुंदर आणि यशस्वी झाला.
या उपक्रमासाठी तब्बल १५५ फळझाडे प्रायोजित केल्याबद्दल रोटेरियन योगेंद्र कुरघोडे यांचे विशेष आभार! या उदार योगदानामुळे कोंबल टेकडी परिसरात पर्यावरण संवर्धनाबरोबरच भविष्यात अनेकांना फळांचा लाभ मिळणार आहे.
आज लावलेले एक फळ झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली शाश्वत भेट!
🌿 झाडे लावा • झाडे जगवा • पर्यावरण वाचवा 🌍
12th ऑगस्ट –FUSION MEETING
12th ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत फडके नाट्यगृहात व्यावसायिक पुरस्कार सोहळ्यासाठी १५ रोटरी क्लबची फ्युजन सभा झाली. या सभेमध्ये श्री. दिनेश लाड (हिटमॅनचे प्रशिक्षक रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड.) यांना chief guest .DG रोटेरिअन. नितीन ढमाले यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला .’दीप अमावस्या’असूनही ‘मेगा फ्यूजन मीटिंग’ यशस्वी झाली. जिल्हा स्तरावरील पुरस्कारासाठी आवश्यक असलेली उपस्थिती आपण गाठली. आपले ट्रेझरर रोटेरियन सुदीप गायकवाड यांनी Rotary International Dues आणि District Dues वेळेपूर्वी भरून क्लबच्या Compliance मध्ये उत्कृष्ट योगदान दिले. त्यांच्या या तत्पर आणि जबाबदार कार्यामुळे Rotary District 3131 कडून आपल्या Rotary Club of Panvel Central ला USD 125 चा “DG Foundation Coupon” हा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार म्हणजे सुदीपजींच्या नियोजनबद्ध कामाची, जबाबदारीची आणि क्लबप्रती असलेल्या समर्पणाची पोचपावती आहे.
💐 रोटेरियन सुदीप जी. गायकवाड यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
आणि हा गौरव मिळवून देणाऱ्या Rotary Club of Panvel Central च्या संपूर्ण टीमचेही हार्दिक अभिनंदन! 🎊
आपली वेळेवरची कृती — क्लबचा गौरव!
सहकार्याबद्दल रोटरी परिवाराचे आभार आणि अध्यक्ष व त्यांच्या टीमचे अभिनंदन.
16th ऑगस्ट — मेडिकल प्रोजेक्ट
वनवासी कल्याण आश्रम – On-Going Project
16th ऑगस्ट रोजी वनवासी कल्याण आश्रम , चिंचवली पनवेल येथे वार्षिक वैद्यकीय तपासणी आणि उपचार शिबीर हा आपला on -Going Project पार पडला .
समाजातील गरजू व वनवासी बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून मेडिकल प्रोजेक्ट सातत्याने राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला, औषधांचे वितरण तसेच आरोग्य जनजागृतीचे कार्य केले जाते. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आरोग्यदायी जीवनासाठी हातभार लावणे हा आहे. समाजसेवेच्या या प्रवासात वैद्यकीय तज्ज्ञ आणि दानशूर व्यक्तींचे डॉक्टर यांचे सहकार्य आपल्याला लागले .
“निरोगी समाज, सशक्त समाज” या ध्येयाने हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे.
आपल्या वनवासी कल्याण आश्रम येथील On-Going Project मध्ये सर्व रोटेरियन्स, ROTRACTARS, Ann’s,Annets, मान्यवर आणि सेवाभावी मित्रांनी आवर्जून उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला,
उपस्थिती, सहकार्य आणि सेवाभाव यामुळे उपक्रम अधिक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी झाला. समाजातील गरजू आणि वंचित घटकांसाठी अशाच प्रकारे आपण सर्वांनी एकत्र येऊन सातत्याने सेवा कार्य करत राहणे, हीच आपल्या Rotary ची खरी ताकद आहे.
“Service Above Self” या Rotary च्या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत आपण असेच सेवाकार्य अविरत सुरू ठेवूया.
19thऑगस्ट —-BOD Meeting
19thऑगस्ट रोजी BOD मीटिंग पार पडली मीटिंग हॉटेल सुरुची येथे घेण्यात आली.
या बैठकीत पुढील महिन्यात होणाऱ्या प्रकल्प आणि कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. येणाऱ्या महिन्यातील नियोजन आणि नवीन प्रोजेक्ट्सच्या अंमलबजावणीबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
सर्व टीम मेंबर्सनी बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवला. मीटिंग नंतर सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे जेवणाचा आस्वाद घेतला
21 ऑगस्ट– “Ann’s Minister” कार्यक्रम
क्लबतर्फे 12 ऑगस्ट शुक्रवारी रोजी “Ann’s Minister” या अनोख्या आणि मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्लबच्या महिला छान पैठणी नेसून व साजशुंगार करून आल्या होत्या विविध उपक्रम, खेळ, सादरीकरणे आणि संवादात्मक सत्रांचे आयोजन करण्यात आले. सहभागी सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या उपक्रमामुळे रोटरी परिवारातील सदस्यांमध्ये स्नेह, एकोपा आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे रोटरी परिवारातील नातेसंबंध अधिक बळकट होत असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी खेळ खेळून ऍन. Dr . नेहा पाटील ह्या वर्ष 2026 च्या “Ann’s Minister” झाल्या . तसचे ऍन.Dr . रोहिणी घरत ह्या उपविजेता झाल्या . आणि सर्व सहभागी महिला सदस्यांचा गौरव करण्यात आला तसेच भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
विशेषतः रोटेरियन आरती खेर, रोटेरियन सायली सातवळेकर ॲन्स रमा बुवा, ॲन्स सारिका गायकवाड, फर्स्ट लेडी ज्योती गडगे आणि ॲन्स ऋशाली पोटे यांचे विशेष कौतुक व मनःपूर्वक आभार. यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत योगदान अत्यंत मोलाचे होते . यांच्या मेहनतीमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आणि यश प्राप्त झाले.
तसेच सर्वांच्या समर्पित सहभागामुळे हा कार्यक्रम अधिक सुंदर आणि अविस्मरणीय झाला. तसेच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या सर्व रोटेरियन्स, ॲन्स आणि ॲनेट्स यांचेही मनःपूर्वक आभार.
“एकत्रित प्रयत्न, मनापासून सहभाग आणि सेवाभाव” यामुळेच कोणताही कार्यक्रम यशस्वी होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.











