सप्टेंबर 2026 च्या ठळक बातम्या

“The Strength Of Team Is Each Individual Member. The Strength Of Each Member Is The Team.”
“संघाची ताकद म्हणजे प्रत्येक सदस्य. प्रत्येक सदस्याची ताकद म्हणजे संघ”
Rtn. Manoj Angre

Beautiful Quote

वेलकम सप्टेंबर

The Month of Basic Education & Literacy

1st sept – ज़िल्हा परिषद शाळा धामणी शालेय साहित्य वाटप

ठाण्याच्या सुर्वे प्रतिष्ठान तर्फे मिळणारं शालेय साहित्य आणि माध्यम होते “रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल”..

1सप्टेंबर रोजी ज़िल्हा परिषद शाळा, धामणी येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. ठाण्याच्या सुर्वे प्रतिष्ठानचे श्री. सुर्वे आणि त्यांच्यासोबत आपल्या क्लबचे प्रेसिडेंट , फर्स्टलेडी , आणि चार फिमेल रोटेरियन्स धामणीच्या शाळेत उपस्थित होते. शाळेच्या विद्याथींनी छानशे स्वागतगीत बोलून सर्वांचे स्वागत केले. स्वागत सभारंभ नंतर 70 विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य देण्यात आले.आणि मुलांसोबत गप्पा गोष्टी करत त्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले.

“ज्ञानाची भेट, आनंदाची साथ!
शालेय साहित्य मिळताच मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान.”

आणखी काय हवे ….

साहित्य वाटपानंतर शाळेचे मुख्यध्यापक आणि शिक्षकांनी यांनी सर्वांचे आभार मानले .

क्लबचे प्रेसिडेंट , फर्स्टलेडी , आणि चार फिमेल रोटेरियन्स यांनी शाळेची पाहणी केली शाळेची अवस्था खूप बिकट आहे त्यावर क्लब कडून काही होऊ शकते का यावर विचारविनिमय चालू आहे …

2nd Sept – शाडूमाती गणपती मूर्ती कार्यशाळा

2 सप्टेंबर रोजी शाडूमाती गणपती मूर्ती कार्यशाळा डी. बा. पाटील या शाळेत आयोजित करण्यात आली होती. पर्यावरणपूरक गणपतीमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन वीरेंद्र मोरे याने नि:शुल्क केले.
कार्यशाळेदरम्यान गणेशमूर्ती तयार करण्याच्या विविध टप्प्यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ते गणेशमूर्ती घडवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम टाळून शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून, आगामी गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेच्या शेवटी मुख्यधपाक आणि शिक्षकांनी सर्वांचे आभार मानले .

दहीहंडी उत्सव

5 सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय, शाळा क्र. १, पनवेल येथे दहीहंडी उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्साह, एकोपा आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी या उद्देशाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले.
कार्यक्रमासाठी अल्पोपहाराची व्यवस्था President Elect Rtn. Aarti Manohar Kher यांच्या तर्फे करण्यात आली होती . तसेच शाल व श्रीफळ PP Rtn. Priya Patil यांच्या माध्यमातून मिळाले. या मोलाच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक विशेष आभार!
शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य,रोट्रॅक्टर्स तसेच या उपक्रमासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उपसिथित होते विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य—यातूनच समाजसेवेचा खरा आनंद मिळतो.

🌸 शिक्षक दिन उत्सव 🌸

गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान,
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया!
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय, शाळा क्र. १, पनवेल येथे शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षक दिन हा शिक्षकांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्याप्रती आदर दाखवण्यासाठी साजरा केला जाणारा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले.
विद्यार्थी आपल्या आवडत्या शिक्षकांना भेटवस्तू, फुले व शुभेच्छा कार्ड देऊन कृतज्ञता व्यक्त केली
शिक्षकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य—यातूनच समाजसेवेचा खरा आनंद मिळतो.

11 सप्टेंबर – गणपती विसर्जनाच्या तयारीबाबत मीटिंग

11 सप्टेंबर रोजी सुरुची येथे गणपती विसर्जनाच्या तयारीबाबत मीटिंग पार पडली . विसर्जनाच्या दिवसांत कोणताही गोंधळ किंवा तणाव टाळण्यासाठी, प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन अंतिम नियोजन करण्याकरिता पुन्हा रविवारी, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘वडले तलाव’ येथे भेटायचे ठरले . भाविकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी आपले मौल्यवान विचार आणि सूचना मांडण्याकरिता सर्व सदस्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे अशी सूचना देण्यात आली. त्याप्रामाण्ये सर्वजण 13 सप्टेंबर ला सकाळी 11.00 वाजता वडाले तलाव येथे जमा झाले व विसर्जनाच्या दिवसांत कोणताही गोंधळ होणार नाही या करितां कसे नियोजन करता येईल यावर चर्चा झाली आणि कामाची सुरुवात झाली.

15 , 18 , 19, 25 सप्टेंबर गणपती विसर्जन

दीड दिवसाचे , पाच दिवसाचे , सात दिवसाचे , दहा दिवसाचे असे गणपती विसर्जन झाले . या पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक गणपती विसर्जनासाठी रोटेरियन्स आणि रोट्रॅक्टर्सनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
.या प्रसंगी रोटरी सदस्यांनी पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, ‘हरित सण – स्वच्छ पर्यावरण’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. उपस्थित नागरिकांनीही पर्यावरणपूरक उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद देत निसर्ग संवर्धनासाठी आपला सहभाग नोंदविला.
यंदा नवीन कमानीमुळे जागेची काहीशी अडचण निर्माण झाली होती. मात्र सर्वांच्या उत्स्फूर्त उपस्थिती, एकजूट, सहकार्य आणि योग्य नियोजनामुळे गणपती विसर्जन कोणतीही अडचण न येता अतिशय शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे पार पाडता आले.
उपस्थित राहिलेल्या प्रत्येक रोटेरियन आणि रोट्रॅक्टरचे मनःपूर्वक आभार!
आपली उपस्थिती हीच आपल्या रोटरी परिवाराची खरी ताकद आहे.
विशेष आभार
उपस्थित रोटरी सदस्यांसाठी अल्पोपहार रोटेरियन सिकंदर पाटील, रोटरिअन आरती खेर, रोटरिअन सायली सातवळेकर रोटरिअन पौर्णिमा राऊत यांच्याकडून देण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची सेवा रोटेरियन सागर वाणी यांच्याकडून देण्यात आले यांचे विशेष आभार! 🙏💐

आपली एकजूट अशीच कायम राहो आणि आपल्या प्रत्येक उपक्रमाला याच उत्साहाने बळ मिळत राहो!
सेवा हीच रोटरीची ओळख आणि सहकार्य हीच आपल्या रोटरी परिवाराची ताकद!

विशेष बोर्ड मीटिंग – Soni Paithani Exhibition & Sale

23 सप्टेंबर ची बोर्ड मीटिंग ही नेहमीची बोर्ड मीटिंग नसून एक विशेष बोर्ड मीटिंग होती .

दिनांक २, ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आपल्या प्रतिष्ठेच्या “Soni Paithani Exhibition & Sale” या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या पूर्वतयारी, नियोजन आणि जबाबदाऱ्यांच्या वाटपासाठी ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती .
ही बोर्ड मीटिंग असली, तरी पैठणी प्रदर्शन व विक्री हा क्लबचा सामूहिक उपक्रम असल्यामुळे सर्व रोटरी सदस्यांना तसेच ॲन्सना विशेष निमंत्रित म्हणून या बैठकीस आमंत्रित करण्यात आले होते.

अभिमानाचा क्षण

18 सप्टेंबर – अविस्मरणीय उद्घाटन सोहळा

आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस ..

गणपती विसर्जनाच्या काळात गेली अनेक वर्षे सातत्याने समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक विसर्जनासाठी आपले आदरणीय पीडीजी डॉ. गुणे सर निस्वार्थ भावनेने कार्य करत आहेत.

याच सेवाभावी कार्यातून वडाळे तलाव येथे विसर्जन कमान उभारण्याची संकल्पनाही पीडीजी डॉ. गुणे सर यांचीच होती. त्यांच्या संकल्पनेतून आणि अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांतून साकारलेल्या या कमानीचे उद्घाटन त्यांच्या विशेष उपस्थितीत झाले , ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून वडाळे तलाव येथे उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा ला आमदार रो.प्रशांतदादा ठाकूर, महापौर रो.नितीन पाटील माजी सभागृह नेते रो.परेशदादा ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती ममता प्रीतम म्हात्रे, प्रभाग समिती सभापती अजय बहिरा व लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत होते .

गेली अनेक वर्षे सरांनी केलेल्या सातत्यपूर्ण समाजसेवेचे, पर्यावरणपूरक उपक्रमांचे आणि सेवाभावी कार्याचे हे एक सुंदर फलित आणि पोचपावती आहे.

ज्या संकल्पनेची सुरुवात सरांनी केली, त्याच संकल्पनेतून साकारलेल्या कमानीचे उद्घाटनही पीडीजी डॉ. गुणे सर यांच्या विशेष उपस्थितीत —हा क्षण खरोखरच क्लब साठी अभिमानाचा क्षण आहे.

पर्यावरणपूरक गणपती विसर्जन – १२ वर्षांचे सेवाव्रत

आपले आदरणीय PDG डॉ. गिरीश गुणे सर यांच्या दूरदृष्टीतून, संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून पर्यावरणपूरक गणपती विसर्जन तलावाची संकल्पना साकार झाली. पर्यावरणाचे रक्षण आणि गणेशभक्तांची श्रद्धा यांचा सुंदर संगम घडवून आणणारी ही कल्पना खऱ्या अर्थाने भन्नाट आणि दूरदर्शी होती.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या प्रत्यक्ष कामाला Past President Rtn. Dr. हितेंद्र शहा सर यांच्या कार्यकाळात J.M.Mhatre Charitable Trust आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्यातून सुरुवात झाली. तलावाचे काम पूर्णत्वास येईपर्यंत त्यांचा कार्यकाळ जवळपास संपत आला होता. त्यानंतर Past President Rtn. शिरीष वारंगे सर यांच्या कार्यकाळात या तलावामध्ये पर्यावरणपूरक गणपती विसर्जन उपक्रमाची धूमधडाक्यात प्रत्यक्ष सुरुवात झाली.
आणि तेव्हापासून आजपर्यंत आपल्या क्लबने हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सातत्याने पुढे नेला आहे.
आज या उपक्रमाकडे मागे वळून पाहताना जाणवते की, ही केवळ एक सेवा नव्हे, तर जवळजवळ १२ वर्षांचे तप, सातत्य, समर्पण आणि सेवाव्रत आहे.
सर्व रोटेरियन्स, ॲन्स, ॲनेट्स आणि रोट्रॅक्टर्स यांच्या योगदानातून हा उपक्रम वर्षागणिक अधिक सक्षम होत गेला. श्रद्धा जपत पर्यावरणाचे रक्षण करण्याचा हा आपल्या क्लब चा अभिमानास्पद वारसा आहे.

“बाप्पाची भक्तीही आणि पर्यावरणाची काळजीही…”
याच विचारातून आपला क्लब गेली तब्बल १२ वर्षे पनवेल येथील वडाळे तलावावर पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाचा उपक्रम सातत्याने राबवत आहे. विशेषतः पीओपीच्या मूर्तीऐवजी शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करावा, तसेच विसर्जनामुळे जलस्रोत आणि पर्यावरणाची हानी होणार नाही, यासाठी नागरिकांना आवाहन केले जाते.हा केवळ एक उपक्रम नाही, तर भक्ती, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम आहे.गेली १२ वर्षे हे कार्य अखंडपणे सुरू ठेवण्याची शक्ती आणि प्रेरणा आपल्यला बाप्पाच्या आशीर्वादातूनच मिळत आहे.
President
Rtn. Deepak Gadge

Rotary Fellowship & Flag Exchange —

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल (मुंबई, आरआयडी ३१३१) च्या रोटेरियन प्रणाली सुर्वे कोलंबोला गेल्या असताना, ‘ताज समुद्र हॉटेल’ येथे पास्ट प्रेसिडेंट (PP) रोटेरियन नुमान यांची त्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान रोटरी मैत्री आणि बंधुभावाची भावना जपत, दोन्ही क्लबच्या ध्वजांची (फ्लॅग) आनंदाने देवाणघेवाण करण्यात आली.

रोटेरियन प्रणाली,
ही अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बाब आहे. श्रीलंकेतील Rotaract Club of the University of Sri Jayewardenepura, RID 3220 सोबत झालेला हा संवाद आपल्या Rotary Club of Panvel Central साठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मैत्री, बंधुभाव आणि सहकार्याची एक सुंदर सुरुवात आहे.
आपण आपल्या क्लबच्या विविध सेवा प्रकल्पांची आणि उपक्रमांची माहिती प्रभावीपणे मांडलीत तसेच भविष्यात Joint International Service Projects आणि Youth Exchange Initiatives राबविण्याच्या संधी निर्माण केल्या, त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक.
आपल्या या पुढाकारामुळे आपल्या क्लबचे कार्य आणि Create Lasting Impact ही भावना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास निश्चितच मदत होईल.
पुढील काळात या मैत्रीचे रूपांतर अर्थपूर्ण आणि समाजोपयोगी संयुक्त सेवा प्रकल्पांमध्ये व्हावे, यासाठी क्लबच्या वतीने आपल्याला पूर्ण सहकार्य राहील.
Excellent initiative, Rtn. Pranali!
Keep connecting, collaborating and creating lasting impact through Rotary.
____Rotary Club of Panvel Central