4 जुलै 2026 –

2026-2027 पद्ग्रणसोहळा

रोटरी वर्ष २०२६–२७ साठी नवीन अध्यक्ष व संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात मान्यवर पाहुणे, रोटेरियन्स व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमातील प्रमुख वैशिष्ट्ये:

  • नवीन अध्यक्षांचा पदभार स्वीकार
  • नवीन संचालक मंडळाची घोषणा
  • सेवाकार्यासाठी नवीन संकल्प
  • सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अध्यक्ष पदभार रोटेरिअन दीपक गडगे यांना दिला तर सचिवपदाची सूत्रे रोटरिअन ऋषिकेश बुवा यांनी स्वीकारली तसेच नव्या संचालक मंडळाने देखील आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली.

या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून DGN विवेक दीक्षित उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून रोटरीच्या सेवाकार्यात नेतृत्व, समर्पण आणि समाजहिताची भावना जोपासण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे मान्यवर अतिथी PDG डॉ. गिरीश गुणे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत आगामी वर्षासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा विश्वास व्यक्त केला.