दिनांक: 19 जुलै 2026
छाया रिसॉर्टसारख्या निसर्गरम्य आणि सुंदर ठिकाणी आपल्या क्लबची वर्ष 2026–27 ची पावसाळी पिकनिक उत्साहात आयोजित करण्यात आली.
सर्व Rotarians, Anns आणि Annets यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे, आनंदी वातावरणामुळे आणि आपुलकीच्या सहवासामुळे हा दिवस खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला.
पावसाच्या सरी, हिरवागार निसर्ग, मनमोकळ्या गप्पा, हास्य-विनोद आणि आपल्या Rotary परिवारासोबत घालवलेले आनंदाचे क्षण यांनी या पिकनिकच्या सुंदर आठवणी कायमच्या मनात साठवून ठेवल्या.
अशा उपक्रमांमधून आपल्या क्लबमधील मैत्री, आपुलकी, एकोपा आणि Fellowship अधिक दृढ होते.
एक सुंदर दिवस… सुंदर सहवास… आणि आयुष्यभर जपाव्यात अशा सुंदर आठवणी!
Rotary Fellowship चा हा आनंद असाच कायम राहो!