तुमच्या आयुष्यातली 20 मिनिटं आणि त्या वेळात तुम्ही दिलेलं 250 cc रक्त एखाद्याच्या जन्म मृत्यूच्या मधली ठळक रेष बनूशकते..एका माणसाला जीवनदान देण्याचं सामर्थ्य तुमच्या रक्तात आहे.
सर्विस अबव्ह सेल्फ हे वाक्य एक रोटेरियन म्हणून जगताना अशा अनेक सुसंधी आपल्याला मिळत असतात. आणि त्या संधीचं सोनं करणं हे रोटेरियन म्हणून आपलं ध्येय आहे.
रोटरी वर्षं 26/27 चा आपल्या क्लबचा आजचा दुसरा मेडीकल प्रोजेक्ट होता ब्लड डोनेशन कॅम्प. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, भारत विकास परिषद – पनवेल, हिंदू संमेलन समिती – नवीन पनवेल व आंध्र कला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटर यांच्या सहकार्याने रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी आंध्र कला समिती, सेक्टर–२, नवीन पनवेल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. येथील ब्लड डोनेशन कॅम्प अपेक्षेपेक्षा खूप जास्त यशस्वी झाला..आपल्या क्लबचे रोटेरियन डॉ प्रसन्न चंद्रात्रे , डायरेक्टर मेडीकल सर्विसेस यांच्या अथक प्रयत्नातून दोन मोठ्या सामाजिक संस्थांची एकत्र सांगड घालण्याची ही संकल्पना उत्कृष्टपणे पार पडली. १२४ रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले