जुलै 2026 च्या ठळक बातम्या
4 जुलै 2026 —
रोटरी वर्ष २०२६-२७ साठी नवीन अध्यक्ष व संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात मान्यवर पाहुणे, रोटेरियन्स व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातील प्रमुख वैशिष्ट्ये:
- नवीन अध्यक्षांचा पदभार स्वीकार
- नवीन संचालक मंडळाची घोषणा
- सेवाकार्यासाठी नवीन संकल्प
- सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून DGN विवेक दीक्षित उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून रोटरीच्या सेवाकार्यात नेतृत्व, समर्पण आणि समाजहिताची भावना जोपासण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे मान्यवर अतिथी PDG डॉ. गिरीश गुणे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत आगामी वर्षासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा विश्वास व्यक्त केला.
10 जुलै 2026 —
मिनिटस् ऑफ मिटींग खालीलप्रमाणे
सुरवातीच्या सेशनमधे कॉन्स्टीट्युशन आणि बाय लॉज आणि त्यातले यावर्षी केलेले बदल सांगण्यात आले.
नंतर रोटेरियन ऋषिकेश धुंद्रे यांनी क्लासिफिकेशन टॉकमधे , ते ज्या क्षेत्रात काम करतात म्हणजे सायबर सिक्युरीटीमधली काही महत्वपूर्ण माहिती दिली.प्रशनोत्तरांच्या माध्यमातून खूप छान माहिती मिळाली.
सेक्रेटरीअल रीपोर्ट मधे पुढील आठवड्यातले वाढदिवस आणि ॲनिव्हरसरीज सांगण्यात आल्या. तसेच या आठवड्यात होणारे प्रोजेक्टस् सांगितले.मिटींग संपल्यानंतर अर्थातच एकदम हटके जेवणाचा आस्वाद सगळ्यांनी घेतला..कढी , मिक्स भजी , पुलाव ,रायतं आणि कलाकंद असा एकदम सुटसुटीत, चविष्ट आणि हटके मेनू आज असल्यामुळे सगळेच खूश होते आणि त्यासाठी क्लब ॲडमिन रोटेरियन पटेल सरांचे आभार😊🙏
11 जुलै 2026 —
वर्ष 26/27 चा पहिला मेडीकल प्रोजेक्ट
गर्भवती महिलांसाठी प्रोटीन आहार वितरण
11 जुलै 2026 – गर्भवती महिलांसाठी मोफत प्रोटीनयुक्त आहाराचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संजीवनी गुणे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी गर्भवती महिलांना पोषण आणि आरोग्याविषयी मौल्यवान मार्गदर्शन केले.
या उपक्रमाला नगरसेविका प्रीती जॉर्ज मॅडम यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.
निरोगी माता आणि निरोगी बाळ हे आमचे ध्येय आहे असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
12 जुलै 2026 —
वर्ष 26/27 चा दुसरा मेडीकल प्रोजेक्ट
तुमच्या आयुष्यातली 20 मिनिटं आणि त्या वेळात तुम्ही दिलेलं 250 cc रक्त एखाद्याच्या जन्म मृत्यूच्या मधली ठळक रेष बनूशकते..एका माणसाला जीवनदान देण्याचं सामर्थ्य तुमच्या रक्तात आहे.
सर्विस अबव्ह सेल्फ हे वाक्य एक रोटेरियन म्हणून जगताना अशा अनेक सुसंधी आपल्याला मिळत असतात. आणि त्या संधीचं सोनं करणं हे रोटेरियन म्हणून आपलं ध्येय आहे.
रोटरी वर्षं 26/27 चा आपल्या क्लबचा आजचा दुसरा मेडीकल प्रोजेक्ट होता ब्लड डोनेशन कॅम्प. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, भारत विकास परिषद – पनवेल, हिंदू संमेलन समिती – नवीन पनवेल व आंध्र कला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटर यांच्या सहकार्याने रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी आंध्र कला समिती, सेक्टर–२, नवीन पनवेल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. येथील ब्लड डोनेशन कॅम्प अपेक्षेपेक्षा खूप जास्त यशस्वी झाला..आपल्या क्लबचे रोटेरियन डॉ प्रसन्न चंद्रात्रे , डायरेक्टर मेडीकल सर्विसेस यांच्या अथक प्रयत्नातून दोन मोठ्या सामाजिक संस्थांची एकत्र सांगड घालण्याची ही संकल्पना उत्कृष्टपणे पार पडली. १२४ रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले
17 जुलै 2026 —
वर्ष 26/27 ची दुसरी विकली मिटींग
17 जुलै 2026 ला क्लोज़ मीटिंग हॉटेल सुरुची येथे घेण्यात आली.
या बैठकीत पुढील महिन्यात होणाऱ्या प्रकल्प आणि कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
येणाऱ्या महिन्यातील नियोजन आणि नवीन प्रोजेक्ट्सच्या अंमलबजावणीबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
सर्व टीम मेंबर्सनी बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवला. मीटिंग नंतर सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे जेवणाचा आस्वाद घेतला.
12 जुलै 2026 —
वर्ष 26/27 पावसाळी पिकनिक
छाया रिसॉर्ट सारख्या निसर्गरम्य आणि सुंदर ठिकाणी आपल्या क्लबची पावसाळी पिकनिक आयोजित करण्यात आली होती.
सर्व Rotarians, Anns आणि Annet’s यांच्या सहवासामुळे, उत्साहामुळे आणि आनंदी सहभागामुळे ही पिकनिक अविस्मरणीय ठरली. अशा सुंदर आठवणी आपल्या क्लबमधील मैत्री, आपुलकी आणि फेलोशिप अधिक दृढ करतात.
पावसाच्या सरी, हिरवागार निसर्ग आणि आपल्या रोटरी परिवारासोबत काही सुंदर आठवणी निर्माण करून गेल्या 🌧️🌿
24 जुलै 2026 —
वर्ष 26/27 ची पहिली कल्चरल मिटींग
ऋषीमुनी आणि संत महात्म्यांनी दिलेला लोककल्याणाचा वारसा रोटरी क्वब ऑफ पनवेल सेंट्रल गेली 36 वर्षं जपतोय. कल्चरल मिटींग याच धारणेवर आधारित होती . रोटरीची सेवेची सात सूत्र म्हणजेच सेव्हन फोकस एरिया आणि सप्तर्षींमधल्या सात ऋषीनी केलेलं जगत् कल्याणाचं कार्य यांची सांगड घालाण्याचा एक प्रयत्न आमच्या क्लब ने कालच्ल्रल मिटींग मधे केला.
31 जुलै 2026 —
Fireside Meeting
31 जुलै 2026 ला fireside मीटिंग संग्राम ढाबा येथे घेण्यात आली.या बैठकीत पुढील महिन्यात होणाऱ्या प्रकल्प आणि कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
येणाऱ्या महिन्यातील नियोजन आणि नवीन प्रोजेक्ट्सच्या अंमलबजावणीबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सर्व टीम मेंबर्सनी बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवला.
But many hearts can brighten the dark.
With every smile and every deed,
We answer hope where others need.
Together we build, together we care,
With kindness, strength, and love to share.
Step by step, side by side,
Creating change with humble pride.
The marks we leave are more than signs,
They live in hearts and stand through time.
For when we serve with purpose and grace,
We create a lasting impact in every place.
*Together, we create lasting impact.*






